स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर सन २०११- १२ मध्ये दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी


 अकोला,दि.१८(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.३० जुलै २०११ च्या अधिसुचनेव्दारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला या कार्यालयाने दि.३० जुलै २०११ ते ३१ ऑगस्ट २०१२ या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले आहेत. या निर्गमित केलेल्या जातवैधता प्रमाणपत्रावर मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.२७१३/२०१५ च्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी निर्गमित केलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने  या कालावधीत (दि.३० जुलै २०११ ते ३१ ऑगस्ट २०१२) जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, या समिती कार्यालयाकडे जातीच्या दाव्यापृष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अरविंद वळवी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ