आधुनिकीकरणासाठी मदरशांकडून प्रस्ताव मागविले


       अकोला, दि.(जिमाका)-  निवासी मदरशांमध्ये पायाभूत सुविधा निर्मिती करुन आधुनिकीकरण  करण्यासाठी  येत्या शनिवार दि.३० पर्यंत दोन प्रतित  अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय , अकोला येथे सादर करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी केले आहे.
       मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध  वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित  देता यावे यासाठी तसेच  इयत्ता नववी ते १२ वी तील तसेच औद्योगीक  प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे यादृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभुत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे इत्यादी बाबींसाठी  अनुदान दिले जाते. त्यासाठी शासन निर्णयामध्ये नमुद केलेल्या अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या फक्त निवासी मदरसांनीच  विहीत प्रपत्रात त्यांचे प्रस्ताव परिपुर्ण कागदपत्रांसह व्दिप्रतीत  शनिवार दि.३० पर्यंत अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी  कार्यालय, अकोला येथे सादर  करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ