राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान निधी: सार्वजनिक ग्रंथालयांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविले


            अकोला,दि.२१ (जिमाका)- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गंत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान , कोलकाता  यांच्या  असमान निधी  योजनेतर्गंत  राज्यातील शासनमान्य सार्वजनिक  ग्रंथालयांच्या  सर्वांगिण  विकासासाठी  अर्थसहाय्याच्या   विविध योजना राबविण्यात येतात.  सन २०१९-२० पासुन असमान निधी योजनांसाठीचे  विविध प्रस्ताव  www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या  संकेतस्थळाव्दारे Online  पध्दतीने सादर करण्याबाबत प्रतिष्ठानकडुन निर्देश देण्यात आले आहेत.
            या योजनासाठी करावयाचा अर्ज -  त्या अनुषंगाने सदर असमान निधी  योजनांचा लाभ घेण्यासाठी Online पध्दतीने  अर्ज कसा करावा?    या बाबत www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावरील असमान निधी योजना  या  खिडकीखाली देण्यात आलेल्या ‘User guide for applying online assistance’  यावर सविस्तर  माहिती व  मार्गदर्शन  करण्यात आले आहे.
            उपरोक्त मार्गदर्शक सुचनांनुसार इच्छुक  शासनमान्य सार्वजनिक  ग्रंथालयांनी आपणास आवश्यक असलेल्या असमान निधी योजनेचे  प्रस्ताव उपरोक्त  संकेतस्थळावरून उपलब्ध (download) करून दिलेल्या सुचनांनुसार Online पध्दतीने दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अपलोड करावेत. तसेच सदर अर्जाची प्रिंट  काढुन अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रासह पस्ताव चार प्रतित संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी  कार्यालयास  दि.११  डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर  करावेत. तद्नंतर प्राप्त  झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
            खाली  दिलेल्या योजनांचा लाभ  राज्यातील इच्छुक शासनमान्य  सार्वजनिक  ग्रंथालयांना घेता घेता येईल.
असमान निधी योजना सन २०१९-२० साठी (Non matching Schemes)ग्रंथालय       सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार  यासाठी असमान निधीतुन अर्थसहाय्य,  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान  ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य,  महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग  व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य , बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.
           राजा राममोहन रॉय ग्रंथालय  प्रतिष्ठानच्या  योजनांबाबत इच्छुकांनी अधिक माहितीस्तव आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in  हे संकेतस्थळ पहावे. उपरोक्त योजनेंचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणा-या  अर्ज हा Online  पध्दतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रे अपलोड करून इंग्रजी/हिंदी भाषेत  भरावा, असे  आवाहन सुभाष हि. राठोड, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय  संचालनालय, महाराष्ट्र राज्य , नगर भवन, मुंबई यांनी  राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ