ई-पॉस द्वारे धान्यवितरण; ८४ टक्के शिधापत्रिकाधारकांना मिळतोय लाभ :उर्वरित शिधापत्रिकांची तात्काळ ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन


अकोला,दि.३०(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानात  ई-पॉस मशिन्स बसविण्यात आल्या असून त्याद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून पात्र लाभार्थ्यांनाच निश्चित अन्नधान्याचा लाभ मिळत आहे. एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी ८४ टक्के शिधापत्रिकाधारक सध्या ऑनलाईन नोंदणी झालेल्या शिधापत्रिकेद्वारे धान्य घेत आहेत. अद्यापही उर्वरित शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका तात्काळ ऑनलाईन नोंदणी करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने रास्तभाव दुकानदारांना केले आहे.
जिल्ह्यात २ लाख ९४ हजार ४२९  शिधापत्रिकाधारक ऑनलाईन नोंदणी झाले आहेत.  या शिधापत्रिकावर सदस्य संख्या तब्बल १७ लाख ३० हजार ६७० इतकी आहे. यातील ६ लाख ७१ हजार ४८७ लोइकांचे आधार सिडींग झाले आहे.   त्यातील  दोन लाख ५० हजार ७५ शिधापत्रिकाधारक प्रत्यक्ष धान्य वितरणाचा लाभ घेत आहेत. असे एकूण ८४.९३ टक्के लोक या सुविधेचा लाभ घेत आहेत.
तरी अकोला जिल्ह्यातील सर्व रास्त्भाव दुकानदारांनी, ज्या शिधापत्रिकाधारकांची अद्यापही Online नोंदणी झालेली नाही अशा सर्व सदस्यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बॅकपासबुक व असल्यास गॅस बुक ही कागदपत्रे तहसिल कार्यालय पुरवठा विभागात / अन्न्धान्य वितरण अधिकारी कार्यालय यांचे कडे दाखल करावी. ज्या शिधापत्रिका धारकांचे Thumb e-posमशीनवर पडताळणी होण्यास काही अडचण येत असल्यास याबाबत कोणत्याही शिधापत्रिकाधारकांची शंका, तक्रार असल्यास त्यांनी संबधित तालुक्याचे निरिक्षण अधिकारी / पुरवठा निरिक्षक यांचे कडे लेखी अर्ज सादर करावा.
तालुकानिहाय निरिक्षण अधिकारी व पुरवठा निरिक्षक यांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत . 
निरिक्षण अधिकारी-
अकोला-9665708902 , अकोला शहर-9764450052, अकोट-9822735526, बाळापूर-8275837689, बार्शीटाकळी-9665708902, मुर्तिजापूर-9665731602, पातूर-8275837689, तेल्हारा-9822735526.
पुरवठा निरिक्षक-
अकोला-8149200910, अकोला शहर-7020195241, 8329807855, अकोट-9921940307, बाळापूर-9604479047, बार्शीटाकळी-9850013365, मुर्तिजापूर-9763291906, पातूर-9422118850,  तेल्हारा-9922256615.
शिधापत्रिकाधारकांकडे 12 अंकाचा RC नंबर उपलब्ध असल्यास आपल्या शिधापत्रिकेबाबतची ऑनलाईन माहीती www.mahaepos.gov.in या वेबसाई वर  RC Detail मध्येचेक करु शकता. तसेच सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली हेल्पलाईन क्रमांक 1800-22-4950 वर संपर्क करु शकता. कोणताही पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारक धान्य पुरवठ्यापासुन वंचीत राहणार नाही याबाबत स्वस्तधान्य दुकानदार व पुरवठा विभाग प्रयत्नशिल असुन याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. ज्या शिधापत्रिका धारकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत Off line धान्य वाटप करण्यात येवु नये तसे आढळुन आल्यास संबधित रास्तभाव दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. 
शासनाच्या ऑनलाईन धान्य वाटपामुळे अकोला जिल्ह्यात अंदाजि 5000 क्विंटल धान्याची बचत होणार आहे.  E-posमशिनव्दारे ऑनलाईन धान्य वाटपाबाबत शासनाच्या धोरणाचा सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारक व रास्तभाव दुकानदारांनी स्विकार करुन प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ