नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा




अकोला, दि. 2 (जिमाका)-   भारतीय मौसम विभाग यांच्या संदेशानुसार दि. 2 नोव्हेंबर 2019 च्या संदेशानुसार  दि. 4 नोव्हेंबर दरम्यान विदर्भातील सर्व जिल्हयात पाऊस विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपुर्णा व दगड पारवा हे प्रकल्प 100 टक्के भरले असून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. तसेच मुर्तिजापूर तालुक्यातील पुर्णा नदीवर असलेले घुगसी बॅरेज 95 टक्के भरले असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये करण्यात येत आहे. तसेच पुर्णा नदीवर असलेल्या नेर धामना बॅरेज जलसंचय पातळी वाढविण्याचे काम सुरु असुन पुर्णा नदी पाणी पातळी वाढणार आहे. नदी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच क्षेत्रीय यंत्रणानी मुख्यालयी उपस्थित राहणाबाबत सूचित करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी जिंतेद्र पापळकर यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन