पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात १७६ उमेदवारांची निवड


अकोला,दि.१८(जिमाका)- जिल्हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था  अकोला यांचे संयुक्‍त विद्यमाने आयोजित  पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्यात ३१९ उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यापैकी १७६ उमेदवारांची प्राथमिक निवड झाल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक  सु. रा. झळके यांनी दिली आहे.
 जिल्हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था  अकोला यांचे संयुक्‍त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा शनिवार दि. १६ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अकोला येथे संपन्न झाला. सदर मेळाव्याचे उद्याटन एम. बी. बंडगर  प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अकोला  यांच्या हस्ते करण्यात आले, प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सुधाकर झळके अकोला यांनी केले. या मेळाव्यात एम.डि. जेम्स  प्रा. लि. बल्लारपूर जिल्हा चंद्रपुर, युरेका फोर्ब्स  अकोला, मेटलमन ॲटो लिमी./बडवे इंजिनियरींग, मॉर्डन फोर्स सेक्युरीटी हैद्राबाद , व्हेरॉक प्रा.लि.औरंगाबाद , संजिव ॲटो लि.  औरंगाबाद या कंपन्याचे एच आर मॅनेजर उपस्थित होते. तसेच या मेळाव्यात वैदेही विष्णू सराफ महाविद्यालय अकोला, ज्ञानेश्वरी बहुउद्देशीय संस्था,  जसनागरा महाविद्यालय, अण्णा साहेब पाटील आर्थ‍िक  मागास विकास महामंडळ यांनी  आपले योजने बाबत माहीतीचे स्टॉल लावले होते.
                       मेळाव्यामध्ये एकुण ३१९ उमेदवार उपस्थित होते त्यापैकी १७६ उमेदवारांची  प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्याकरीता झोडपे सर, उपप्राचार्य ठोकरे सर, घोंगळे सर औद्योगीक प्रशिक्षण संस्था अकोला यांचे  विशेष मार्गदर्शन लाभले  कार्यक्रमांचे सुत्रसंचालन पोफळी व आभार प्रदर्शन  श्रीमती  शेंडे  यांनी केले.  रोजगार मेळावा यशस्वी होण्याकरीता  औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अकोला    जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाचे कर्मचारी व शिक्षक वृंद यांनी  परीश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ