प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बॅंक खाते आधार संलग्न करा; नवीन नाव नोंदणीही सुरु जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन


        अकोला,दि.२९(जिमाका)- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपले बॅंक खाते हे आधार संलग्न करावे तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी,असे आवाहन  जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने  शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही विहित अटी व शर्ती निर्धारित करण्यात आल्या आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन टप्प्यात  प्रति कुटूंब वार्षिक सहा हजार रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  या संदर्भात कृषि आयुक्त पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी  त्यांचा बॅंक खाते क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन  नाव नोंदणी करावी. बॅंक खाते आधार संलग्न करण्यासाठी आपले सेवा केंद्रात दहा रुपये तर नवीन नाव नोंदणीसाठी १५ रुपये शुल्क अदा करावे लागेल. येत्या सात दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. तरी शेतकऱ्यांनी आपले बॅंक खाते आधारसंलग्न करावे व  ज्यांनी नाव नोंदणी केली नसेल अशांनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.  
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ