बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियानाचा आजपासून (दि.7) प्रारंभ


अकोला, दि.6 (जिमाका)-  बालकामगार प्रथे विरोधात जनजागृती करण्यासाठी गुरुवार दि.7 पासून अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी सर्व विभागप्रमुखांची कार्यशाळा होणार असून त्यात बालकामागार विरोधी कायद्याबाबत  मार्गदर्शन केले जाणार आहे.  या अभियानात सप्ताहभर जनजागृतीचे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. त्यात जिल्ह्यातील बालकामगार बहुल क्षेत्र निर्धारित करुन तपासणी करणे, संबंधित मालकांकडून बालकामगार कामास न ठेवण्याबाबत  हमीपत्र घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशनच्या बैठकांमध्ये  तसेच व्यापारी संघटनांचे चर्चासत्र घेऊन जनजागृती करणे,  महामार्गावरील विविध ढाब्यांची तपासणी करणे, सामुहिक शपथ घेणे, जनजागृतीपर स्पर्धा घेणे, प्रचार प्रसिद्धी करणे आदी  उपक्रम महिनाभर राबविण्यात  येणार आहेत, असे सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ