रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी महा- वॉकेथॉन


अकोला,दि.३०(जिमाका)-रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी  शहरात महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस महापौर अर्चनाताई मसने , प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी  गोपाल वरोकार आदी मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
हुतात्मा चौक येथून या वॉकेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली.  या स्पर्धेत  नवोदय विद्यालय, अकोला, सुप्फा इंग्लिश स्कूल,  गणेश कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा विषयक बॅनर्स प्रदर्शित करुन जनजागृती केली. यावेळी  सुप्फा फाऊंडेशनचे अध्यक्ष  मोहम्मद फाजिल मोहम्मद अब्दुल रज्जाक, प्राचार्य अब्दुल  साबिर अब्दुल कादीर, डॉ. के. व्ही . मेहरे, डॉ. व्ही. यु. जामनिक  यांचीही उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ