स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान


        अकोला,दि.22 (जिमाका)-  अकोला जिल्ह्यात  कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  बुधवार दि.4 ते शनिवार दि.7 डिसेंबर या कालावधीत  पोलीस अधिक्षक, अकोला यांनी त्यांना कलम 36 मुंबई पोलीस  कायद्यानुसार  प्राप्त असले्या अधिकारान्वये अकोला जिल्हृयातील सर्व पोलीस फौजदार व त्यापेक्षा वरीष्ठ अधिकारी  यांना स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान करीत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार  या अधिकाऱ्यांना  मिरवणूकीचा मार्ग ठरविणे,मिरवणूकीतील जमावाचे वर्तन ठरविणे,  सार्वजनिक जागी अडथळा न होऊ देणे,  सार्वजनिक ठिकाणी येण्या जाण्याचे मार्ग निश्चित करणे,  वाद्य वाजविण्यास मनाई करणे, आवाजाची मर्यादा निश्चित करणे,  याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार या सक्षम अधिकारी यांना येतील तसेच हे सक्षम अधिकारी  यांना कलम 33,36,37, ते 40, 42.43 व 45 अन्वये आदेश देणे शक्य होणार आहे. असे पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ