अकोला जि.प.,पं.स. निवडणूक कार्यक्रम


अकोला,दि.२०(जिमाका)-  मा. राज्‍य निवडणूक आयोगाने अकोला जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीच्‍या सार्वत्रिक निवडणुकींकरीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केल्‍यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत संबंधीत क्षेत्रात आचारसंहिता अंमलात राहील,असेही स्पष्ट केले आहे.
निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी निवडणूक अधिसुचना प्रसिद्धी.
बुधवार  दि. १८ते  सोमवार दि.२३ डिसेंबर  सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारणे.
मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्‍यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी,त्‍यावर निर्णय देणे  वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.
शुक्रवार दि.२७ डिसेंबर नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्‍याबाबत किंवा ते नामंजूर करण्‍याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्‍या निर्णयाविरुध्‍द जिल्हा न्‍यायाधिशाकडे अपिल करण्‍याची शेवटची तारीख
सोमवार दि. ३० डिसेंबर  जिल्‍हा‍ न्‍या‍यधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्‍याची संभाव्‍य शेवटची तारीख. सोमवार दि. ३० डिसेंबर जिल्‍हा न्‍यायाधिशांनी अपिल निकालात काढल्‍यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी .
उमेदवारी मागे घेण्याची मुदतः-
सोमवार दि. ३० डिसेंबर  सकाळी ११ ते दुपारी तीन पर्यंत जेथे अपिल नाही तेथे
बुधवार दि. जानेवारी २०२० सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत  जेथे अपिल आहे तेथे
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटपः-जेथे अपिल नाही तेथे सोमवार दि. ३० डिसेंबर दु. साडेतीननंतर, जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. जानेवारी २०२० दु.साडेतीननंतर
मतदानाची तारीखः-  मंगळवार दि. जानेवारी २०२० सकाळी साडेसात ते  सायंकाळी साडेपाचर्यंत.
मतमोजणी तारीखः-  बुधवार दि. जानेवारी २०२०सकाळी दहा वाजेपासून.
निवडून आलेल्‍या सदस्‍यांची नावे रविवार दि.१० जानेवारी २०२० र्यंत प्रसिद्ध करण्‍यात येतील.  
याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे,असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ