जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन स्पर्धकांनी 9 डिसेंबर पर्यंत संपर्क साधावा


                  
अकोला,दि.26 (जिमाका)-  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा  संचालनालयाच्या  विद्यमाने तथा जिल्हा क्रिडा  अधिकारी कार्यालय, अकोला व्दारा जिल्हयातील  15 ते 29  वयोगटातील युवक व युवतींच्या  सुप्त  कला गुणांना   वाव देण्‍यासाठी   तसेच  राष्ट्रीय   एकात्मता, राज्याची   संस्कृती  व परंपरा जतन करण्यासाठी  जिल्हास्तरीय युवा  महोत्सवाचे  अयोजन   करावयाचे  निश्चित झालेले आहे. या स्पर्धेंत सहभागी होण्यासाठी अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे नाव, शाळा,महाविद्यालय, कार्यालयाचे नांव, जन्मतारीख व संपर्क क्र. ईमेल आयडी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडीयम अकोला येथे  सोमवार दि. 9 डिसेंबर 2019  पुर्वी अथवा पर्यंत प्रत्यक्ष , ई-मेल द्वारे संपर्क साधावा. असे आवाहन अकोला जिल्हा युवा महोत्सव आयोजन समितीने केला आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये  स्पर्धात्मक  व अस्पर्धात्मक  अशा दोन प्रकारामध्ये  कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात येईल.
स्पर्धात्मक कार्यक्रम व कलाकारांची  संख्या  पुढीलप्रमाणे  - लोकनृत्य 20, लोकगीत 06, एकांकिका इग्रंजी/हिंदी 12, शास्त्रीय गायन हिंदूस्थानी 01, शास्त्रीय नृत्य 01, सितार01, बासरी01, तबला01, वीणा 01, मृदंग 01, हार्मोनियम लाईट 01, गिटार 01,  मणिपुरी नृत्य01, ओडिसी नृत्य 01, भरतनाटयम 01, कथ्थक 01 ,  कुचीपुडी नृत्य01 , वत्कृत्व 01 अस्पर्धात्मक कार्यक्रमात राज्याच्या /जिल्हयाच्या  संस्कृतीचे दर्शन घडविणा-या कार्यक्रमांचा  समावेश  राहील.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवातून  उत्कृष्ठ कलाकारांचा संघ/कलाकारांची निवड करून  विभागस्तरीय व विभागस्तरीय युवा महोत्वावातुन राज्य व राज्यस्तरीय  युवा महोत्सवातून  राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात येईल.
युवा महोत्वामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेचे  निकर्ष  - सहभागी युवक/युवती 15 वर्ष पुर्ण व 29 वर्षाआतील असावे, सहभागी युवक/ युवती जिल्हयातील रहिवाशी असावे,   एकांकीकेमध्ये सहभागी होणारे  सर्व युवा  कलाकार तसेच एकांकीका लेखक , निर्माता , दिग्दर्शक सुध्दा  15 ते 29 वयोगटातील असावे,
 ज्या बाबींना  साथ संगत आवश्यक आहे. असा साथ-संगत देण्या-या कलाकारांना  वयोमर्यादा  लागु नाही.
 ओडीसी, भरतनाटयम, मणीपुरी,‍  कथथक, कुचीपुडी नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना पुर्व मुद्रीत ध्वनीफीत  (कॅसेट, सी.डी. ) वर कार्यक्रम सादर करता येईल.लोकगीत व लोकनृत्य या प्रकारातील गीते,  चित्रपट बाहय असावीत, सहभागी कलाकारांनी  आवश्यक असणारे साहित्य स्वत:च्या जबाबदारीवर आणावे, सयोजकामार्फत फक्त स्टेज, विद्युत व्यवस्था, पुर्व कल्पना दिल्यानंतरच उपलब्ध करुन देण्यात येईल.
            जिल्हास्तरीय युवा महोत्सवात 13 ते 35 वयोगटातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी सहभाग घेण्याच्या दृष्टीकोनातून अकोला जिल्हयातील शाळा, महाविद्यालय, संगीत विद्यालयांनी आपले विद्यार्थी/ विद्यार्थीनींना  सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानीक स्वराज्य संस्था ( महानगर पालीका/नगर परीषद/ जिल्हा परीषद/ग्रामपंचायत)आपल्या  अधीपत्याखालील अधिकारी/कर्मचारी युवा महोत्सवाच्या सहभागाच्या अटी व शर्ती पुर्ण करीत असतील अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास  प्रोत्साहीत करावे व त्यांचे नाव, शाळा,महाविद्यालय, कार्यालयाचे नांव, जन्मतारीख व संपर्क क्र. ईमेल आयडी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडीयम अकोला येथे  सोमवार दि. 9 डिसेंबर 2019  पुर्वी अथवा पर्यंत प्रत्यक्ष , ई-मेल द्वारे सादर करावे. असे आवाहन अकोला जिल्हा युवा महोत्सव आयोजन समितीने केला आहे. अधीक माहितीसाठी  जिल्हा  क्रीडा अधिकारी  कार्यालय, अकोला  संपर्क क्रमांक-0724-2437653 वर संपर्क साधावा असे  जिल्हा क्रीडा अधिकारी अंबादास जाधव यांनी कळवीले आहे.
00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ