जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम; स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन ५ डिसेंबर रोजी

        अकोला,दि.२७(जिमाका)- अकोला जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वतीने स्‍पर्धा परीक्षेची तयारी     करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी  दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सेवेतील अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  या कार्यक्रमात श्रीमती अशिता मित्‍तल (भा.प्र.से.) , श्रीमती वर्षा मीना (भा.प्र.से.) जिल्‍हाधिकारी कार्यालय, अमरावती , विकास मीना (भा.प्र.से.) जिल्‍हाधिकारी कार्यालय, अमरावती , डॉ. प्रविण लोखंडे, जिल्‍हा उपनिबंधक, सह. संस्‍था, अकोला तसेच , अकोला जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर (भा.प्र.से.), जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांची  प्रमुख उपस्थितीअसेल. स्‍पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ