गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजना जनजागृती रथ रवाना





अकोला,दि.22 (जिमाका)-   जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसुन येत आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतक-यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषि विभागाने जनजागृती रथ तयार केला आहे.  या  रथास आज दुपारी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक   कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे , मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ, कृषि विकास अधिकारी गोपाल बोंडे आदि उपस्थित होते.
हा प्रचार रथ  संपुर्ण जिल्ह्यात   खेड्या – पाड्यात जाऊन  शेतक-यांना बोंड अळी नियंत्रण  उपाययोजनांबाबत माहिती देणार आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ