बालहक्क जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान


अकोला, दि.१६(जिमाका)- महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांच्या वतीने बालहक्क सप्ताह साजरा केला जात आहे. दिनांक १४ ते २० या दरम्यान सप्ताहभर बालकाचे हक्क, अधिकार व संरक्षणाच्या दृप्टीकोनातृन विवीध जनजागृतीपर कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानात पाचशेहुन अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला.  यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी करूणा महंतारे यांची उपस्थिती होती.
बालहक्क सप्ताहाचे उदघाटन दि.१४ रोजी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय अकोला येथे करण्यात आले. यावेळी सहायक कामगार आयुक्त राजेश गुल्हाणे यांनी बालकांना त्यांचे हक्क व कायदे या बाबत मार्गदर्शन  केले. दि.१५ रोजी शहरातील विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनांसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, सुनिल 'सरकट, सचिन घाटे, नितीन अहीर, निलेश पेशवे, रेशमा मुरूमकार, प्रविण कथे , योगेंद्र खंडारे, ॲड.सिमा भाकरे,संगिता अभ्यंकर, रेवत खाडे आदी परिश्रम घेत आहेत.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ