ओबीसी महामंडळाच्या एक रकमी कर्ज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


        अकोला,दि.२९(जिमाका)- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ  मर्यादित यांच्या कडून एक रकमी कर्ज परतावा योजना राबविण्यात येते.  या योजनेत  या महामंडळाकडून  ज्या लाभार्थ्यांनी दीर्घ मुदत वा बीज भांडवल अशा योजनांमधून लाभ घेतला असून कर्जाच्या रकमेची परतफेड  दिलेल्या कालावधीत  केलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी एक रकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत एक रकमी कर्ज परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सूट देण्यात येते.  ही योजना ठराविक कालावधीसाठी असून  संबंधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना