लाळखुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम; जिल्ह्यासाठी तीन लाख 15 हजार लस प्राप्त

       अकोला, दि.7 (जिमाका)- जिल्ह्या एफएमडी - सीपी योजनेअंतर्गत लाळखुरकत रोगांच्या सीकरण कार्यक्रम आज (दि.7)पासुन ते शनिवार दि. 30पर्यंत राबविण्यात येणार आहे. या फेरीकरिता जिल्ह्यासाठी  एकूण 3 लाख 15 हजार 920 एफएमडीच्या लसमात्रा प्राप्त झाल्या  आहेत. या लसमात्रा एकुण 75 पशुवैद्यकीय संस्थाना जिल्हास्तरावरून पुरविण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत 100 टक्के जनावरांना एफएमडी रोगाचे लसीकरण करून अकोला जिल्हा लाळखुरकत रोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फतआवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांना नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामधुन तोंडखुरी पायखुरीचे लसीचे लसीकरण करवुन घ्यावे. शासनाचा हा महत्वकांक्षी कार्यक्रम असुन महाराष्ट्र राज्य लाळखुरकत रोगापासून टप्या टप्याने मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे शेतकरऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे.  शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण हे  शक्यतो सकाळच्या व दुपारच्या सत्रात करुन घ्यावे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालय, तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - 1 व श्रेणी - 2  यांच्यावतीने गावा गावातुन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यात सहभाग घेऊन पशुपालकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन  जिल्हा पशुसवंर्धन उपायुक्त यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम