जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक जिल्हाधिका-यांनी घेतला तयारीचा आढावा



         अकोला,दि.29 (जिमाका)-  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत  समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत या बैठकीस अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, सर्व  उपविभागीय अधिकारी तसेच  नोडल अधिकारी आदि उपस्थित होते
              यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी आचार संहिता अंमलबजावणी; त्या संदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र उपलब्धता, कर्मचारी प्रशिक्षण , नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्याबाबत संभाव्य तांत्रिक अडचणींबाबत कायदा व सुव्यवस्था, वाहतुक व्यवस्था, मनुष्यबळ उपलब्धता, मतदार जनजागृती इ बाबींचा आढावा घेतला.
              या संदर्भात सर्व यंत्रणांनी सजग राहुन आपापले निवडणुक कर्तव्य पार पाडावे.  राज्य निवडणुक आयोगामार्फत वेळोवेळी प्राप्त होणा-या सुचनांचे व निर्देशांचे अंमल करावा, असे  निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ