विभागीय आयुक्तांनी घेतला नुकसानी पंचनाम्यांचा आढावा


       अकोला, दि. 7 (जिमाका)-   जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनामा प्रक्रियेचा विभागीय आयुक्त पीयुषसिंह यांनी आढावा घेतला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  अनिल खंडागळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, उपविभागीय अधिकारी  गजानन सुरंजे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात  अद्याप पर्यंत 92.87 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यावेळी विभागीय आयुक्तांनी सुचना केल्या की, ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्यांना परतावा मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दाखल केल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबत खातरजमा करावी. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन सर्व माहिती तात्काळ रवाना करावी. जेणेकरुन वेळेत मदत वितरण शक्य होईल. विमा काढलेले शेतकरी व विमा न काढलेले शेतकरी यांचे सर्वांचे पंचनामे पुर्ण करुन अहवाल सादर करावे, असे त्यांनी निर्देश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ