उद्योग, व्यवसायकांनी सातव्या आर्थ‍िक गणनेस सहकार्य करावे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन


                 अकोला,दि.26 (जिमाका)-  जिल्हृयात सातव्या आर्थ‍िक गणनेस आजपासुन प्रारंभ होत असुन जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायकांनी या गणनेस सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जिल्ह्यात सातव्या आर्थ‍िक गणनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज दि. 26 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली.
जिल्हास्तरीय समन्यव समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , पोलीस अधिक्षक, उपायुक्त, महानगरपालीका, जिल्हा नियोजन अधिकारी , जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक,  नगरपालीकांचे मुख्य अधिकारी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी क्षेत्रीय कार्य विभाग  राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेचे प्रतिनीधी,  कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक  आदींचा समावेश आहे.
 केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) मार्फत  सातवी आर्थ‍िक  गणना घेतली जात आहे. ही गणना सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI)  यांच्या व  सीएससी  ई- गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने केली  जाणार आहे.  सातव्या आर्थ‍िक  गणनेमध्ये प्रत्यक्ष माहिती संकलन, वैधतीकरण , अहवाल लेखन आणि  प्रसिध्दी व प्रसारण  यासाठी माहिती तंत्रज्ञान आधारीत  डिजीटल  प्लॅटफॉर्म वापरला जाईल.  महाराष्ट्रात सातव्या आर्थ‍िक   गणनेसाठी प्रत्येक  कुटूंबास  तसेच विविध आस्थापनांना भेटी देऊन  आज दि.26 नोव्हेंबर पासुन माहिती  संकलन करण्यात येणार आहे. या क्षेत्रकामाची पडताळणी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचे (NSSO) अधिकारी व राज्यातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अधिकारी पर्यवेक्षण  करणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
            आर्थिक जनगणनेत घरगुती उपक्रमांसह शेती व बिगर शेती क्षेत्रातील  वस्तु/सेवा  (स्वत:च्या वापराच्या एकमात्र उद्देशाव्यतिरिक्त) उत्पादन किंवा वितरणात गुंतलेल्या सर्व आस्थानांचा समावेश असेल 2013 मध्ये घेण्यात आलेल्या सहाव्या आर्थ‍िक  गणनेतील व्याप्ती प्रमाणेच  माहिती संकलन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व उद्योग , व्यवसाय  व सेवा  यांची गणना  प्रत्यक्ष घरोघरी व उद्योगास भेट देवून करण्यात येणार आहे. यासाठी  शासनाने एका संस्थेची नियुक्ती केली असुन माहिती संकलीत करणारे प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
            महाराष्ट्रात आतापर्यंत सहा आर्थ‍िक  गणना घेण्यात  आल्या आहेत.  पहिली आर्थ‍िक गणना 1977 मध्ये , दुसरी आर्थ‍िक गणना 1980 मध्ये , तिसरी आर्थ‍िक गणना 1990 मध्ये , चौथी आर्थ‍िक गणना 1998 मध्ये ,  पाचवी आर्थ‍िक गणना 2005 मध्ये ,  तर 2013 मध्ये सहावी आर्थ‍िक गणना घेण्यात आली.
            सहावी आर्थ‍िक गणनेनुसार  महाराष्ट्रात एकुण 61.37  लक्ष आस्थापना कार्यरत होत्या. त्यापैकी 32.94 लक्ष (53.68%) आस्थापना ग्रामीण भागात तर  28.43  लक्ष (46.32%)  आस्थापना शहरी भागात असल्याचे आढळुन आले. महाराष्ट्रातील एकुण  रोजगारनिर्मितीची संख्या 145.12  लक्ष एवढी आढळून आली व  यापैकी 41.77 %  ग्रामीण   भागात तर 58.23 %  शहरी भागात रोजगारनिर्मिती झाल्याचे आढळून आले. उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक 29.18 लक्ष (20.10%)  रोजगार निर्मिती होती. त्याखालोखाल किरकोळ व्यापार क्षेत्रात 26.73 लक्ष (18.42%)  तर पशुधन क्षेत्रात 24.11 लक्ष (16.61%)  एवढी रोजगार  निर्मिती नोंदविली गेली असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी भा. र मोहोड यांनी यावेळी दिली.
                                                                             00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ