जबलपुर येथे 18 ते 23 नोव्हेबर रोजी सैन्य भरती



        अकोला, दि.4 (जिमाका)-  सिगनल रेजिमेंन्ट सेंटर जबलपूर येथे दि. 18 ते 23 नोव्हेबर रोजी सोल्जर जिडी, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर टिडीएन या पदासाठी सैन्य भरतीचे  आयोजन करण्यात आले आहे. माजी सैनिक , विधवा पत्नी व युध्द विधवा यांच्या पाल्यांनी  या संधीचा लाभ  घ्यावा असे आवाहन  प्रभारी जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.
            सोल्जर टेक्नीकल या पदासाठी 12 वी सायन्स पास फिजीक्स ,केमेस्ट्री,मॅथ्स व इंग्रजी या विषयासह एकुण 50 टक्के मार्कसह (C-2 grade in Indil Subject & aggregate of 5 pts for Bd with grading system) व प्रत्येक विषयात किमान 40 टक्के मार्क अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच सोल्जर जीडी  या पदासाठी 10 वी पास एकुण 45 टक्के मार्कसह प्रत्येक विषयात किमान 33 टक्के मार्क (Grading System minimum of D grade (33 -40) in Indil Subject or grade  with contains 33 % aggregate of C-2) अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. सोल्जर टिडीएन  या पदासाठी 10 वी पास प्रत्येक विषयात किमान 33 टक्के मार्क अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.(Except House Keeper & mess Keeper Trades). सोल्जर टिडीएन  या पदासाठी 8 वी  किंवा मॅट्रीक , 10 वी पास प्रत्येक विषयात किमान 33 टक्के मार्क अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.(Except House Keeper & mess Keeper Trades). 10 वी किंवा मॅट्रीक पास खेळाडू वरील पदांसाठी  भरती होवू शकतात,  अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक अधिकारी  कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवार अकोला यांचेशी संपर्क साधावा.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ