मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर


अकोला, दि.१५(जिमाका)-  दिनांक १ जानेवारी २०२०  या अर्हता दिनांकावर  आधारीत छायाचित्र मतदार  यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.  निवडणूक आयोगाने दिलेल्या नियोजनानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जाहीर झालेले वेळापत्रक याप्रमाणे-
शुक्रवार दि.२० डिसेंबर पर्यंत- SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण सारख्या इतर पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रमाव्दारे  मतदार पडताळणी  कार्यक्रम (EVP).
सोमवार दि. ३०डिसेंबर२०१९- इंटीग्रेटेड प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी-,
सोमवार दि. ३० डिसेंबर २०१९ ते गुरूवार दि.३० जानेवारी २०२०- दावे  व हरकती स्विकारण्याचा कालावधी,
शनिवार दि.जानेवारी २०२० आणि रविवार जानेवारी २०२० तसेच शनिवार दि. ११ जानेवारी २०२०,रविवार  दि.१२ जानेवारी २०२०- विशेष मोहीमांचा कालावधी.
सोमवार दि. १० फेब्रूवारी २०२० पुर्वी - दावे  व हरकती निकालात काढणे.
गुरूवार दि. २०फेब्रूवारी २०२० पुर्वी - प्रारूप मतदार यादीच्या  मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी करीता आयोगाची  परवानगी घेणे.
बुधवार दि. २६ फेब्रूवारी २०२० पुर्वी - डाटाबेस अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई इ. मतदार यांदीची सोमवार दि. मार्च २०२०- मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी.
हा पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील २८- अकोट, २९ बाळापूर, ३०- अकोला पश्चिम, ३१ अकोला पूर्व, ३२- मुर्तिजापूर या सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये राबविला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या वेळापत्रकानुसार आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, वगळणे, दुबार, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळणे याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन  करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ