पदवीधर, शिक्षक मतदार संघ अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर रोजी


       अकोला, दि.13 (जिमाका)-  राज्यात होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी मतदार नोंदणीच्या कार्यक्रमास मुदतवाढ देण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना निवेदने प्राप्त झाले आहेत. तथापि अंतिम मतदार यादी 30 डिसेंब्र रोजी प्रसिद्ध होणार असून निरंतर मतदार नोंदणी सुरु राहणार असल्याने  मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची आवश्यकता नाही असे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
 या संदर्भात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना प्राप्त पत्रात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे.  या कार्यक्रमांतर्गंत दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक होता. या कार्यक्रमांतर्गत  शनिवार दि.23 रोजी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी  झाल्यानंतर दि.23 नोव्हेंबर ते दि.9 डिसेंबर या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. दि.30 डिसेंबर रोजी अंतिम  मतदार यादी  प्रसिद्धी होणार आहे. त्यानंतर निरंतर मतदार नोंदणी  (continuous updation) चालु राहणार असुन त्याअंतर्गत नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विहित  कार्यपद्धतीनुसार निकाली काढण्यास  पात्र   असलेले सर्व दावे निकाली काढून पात्र मतदारांची नावे मतदार  यादीत समाविष्ठ करण्यात येणार आहेत. त्यामुळे पदवीधर/ शिक्षक मतदारसंघाकरीता मतदार नोंदणी  करण्यासाठी मुदतवाढ देण्याची आवश्यकता वाटत नाही,असे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी कळविले आहे.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ