व्यायामशाळा विकास अनुदान योजना करीता प्रस्ताव आमंत्रित


अकोला, दि.4 (जिमाका)-  जिल्‍हयात क्रीडा  संस्कृतीचे संवर्धन, प्रचार , प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण करण्याचे अनुषंगाने तसेच ग्रामीण /शहरी भागात खेळविषयक सुविधा निर्माण  करण्याकरीता  जिल्हा क्रीडा  अधिकारी कार्यालयामार्फत  व्यायामशाळा विकास  अनुदान  योजना  राबविण्याकरीता परिपुर्ण प्रस्ताव सोमवार (दि.11)पर्यंत  मागविण्यात येत आहेत.
 या योजनेतंर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे,  व्यायाम साहित्य खरेदी करणे तसेच खुली व्यायामशाळा(ओपन जिम) या तीन बाबींकरीता  प्रतिबाब  7 लक्ष रूपये अनुदान  मंजुर करण्यात येते.  एकावेळेस  एकाच बाबीकरीता प्रस्ताव  अपेक्षित आहे.  अनुदानासाठी पात्र संस्थांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था , ग्रामपंचायत, नगरपरिषद,  महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास    सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणा-या सर्व  शासकीय पुर्वप्राथमिक , माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळा/आश्रमशाळा  व वसतीगृह, क्रीडा विभागाच्या विविध  समित्या , तसेच  पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय स्पोर्टर्स क्लब,  तसेच शासकीय    महाविदयालये , याप्रमाणे खाजगी शैक्षणिक, संस्थेव्दारे चालविण्यात  येणा-या प्राथमिक, माध्यमिक  शाळा क. महाविदयालये, ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता  दिली आहे  व ज्यांना  शासनामार्फत अनुदानाचा प्रथम टप्पा मंजुर  होवून, पाच आर्थ‍िक  वर्ष पुर्ण  झाले आहेत अशा संस्था असा प्राथम्यक्रम राहील,
 इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज शुक्रवार (दि.8) पर्यंत  जिल्हा क्रीडा  अधिकारी  कार्यालयातून  कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावे. अर्जासोबत जागेचे ख्ररेदी/दानपत्र/नोंदणीकृत कागदपत्र,  बँक बॅलन्स, करावयाच्या कामाचे (संबंधित शासकीय अभियंता यांचे व्दारा) अंदाजपत्रक ,  नोंदणी  प्रमाणपत्र , गत वर्षाचे लेखा विवरण तसेच  शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव दोन प्रतीत  विहित मुदतीत जिल्हा क्रीडा  अधिकारी कार्यालयात जमा करावा, असे  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव हे कळवितात.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ