कावड यात्रा मार्गावर रस्ते दुरुस्ती, दिवे, रुग्ण्वाहिका, वैद्यकीय पथकांची सज्जता करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 


अकोला, दि.८(जिमाका):- येथील राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी जलाभिषेकासाठी येणाऱ्या कावड यात्रेसाठीच्या मार्गावर भाविकांना सुविधा देण्यासाठी रस्ते दुरुस्ती, अतिक्रमणे मोकळी करणे, दिव्यांची सुविधा, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथकांची सज्जता करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

कावड यात्रा नियोजनासंदर्भात आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, सुरेश आसोले, तसेच मनपाचे अधिकारी, सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कावड यात्रेबाबत भाविकांसमवेत मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत भाविकांकडून झालेल्या मागण्यांमधील मुद्यांवर उपाययोजना करण्याबाबत आज आढावा घेण्यात आला. गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पात्रात जिथून जलाभिषेकाचे पाणी घेतले जाते, त्या जागेवर सुरक्षा उपाययोजना, पुलावर सुरक्षा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था,  तसेच गांधीग्राम ते अकोला या मार्गावर  रस्ते दुरुस्ती, भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवणे याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिले. तर रस्ते कामांबाबत उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी,असेही निर्देश दिले. पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना