मुर्तिजापूर येथे ‘बालकांचे हक्क व कायदे’ प्रशिक्षण कार्यशाळा
अकोला दि. 12 (जिमाका) -एकात्मिक बालविकास सेवायोजना कार्यालय व तहसिल कार्यालय, मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क व कायदे प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समिती सभापती उर्मिलाताई डाबेराव व उपसभापती
देवाशिष भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी
रिता ऊईके यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. वैशाली
गावंडे यांनी बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बाल लैंगिक
अत्याचार अधिनियम 2012 याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे
संरक्षण अधिकारी सुनिल लाडूलकर यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम, बाल यंत्रणा
याविषयी माहिती दिली. ॲड. मनिषा भौरे यांनी सखी वन स्टॉप सेंटरचे कार्य, अत्याचार
पिडीत महिलांना या सेंटर मार्फत कशाप्रकारे मदत केली जाते याबाबत माहिती दिली.सुषमा
मेश्राम यांनद मैत्री नेटवर्क बाबत माहिती दिली. तहसिलदार प्रदीप पवार यांनी मार्गदर्शन
केले की, तालुका बाल संरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून तालुक्यामध्ये बाल विवाह
त्याचप्रमाणे बालकांशी संबंधीत होणारे अत्याचार रोखण्यासंदर्भात ग्राम बाल संरक्षण
समितीने पुढाकार घ्यावा. तसेच बालविवाह संदर्भात चाईल्ड लाईन 1098 ला संपर्क साधावा
व असे विवाह रोखण्याकरीता पुढाकार घ्यावा. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव
निमित्त अंगणवाडी सेविका यांनी हर घर तिरंगा विषयी गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी.
कार्यशाळेचे सुत्रसंचालन पंडीत राठोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रदीप टाक
यांनी केले. या प्रशिक्षणात तालुक्यातील 190 अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. कार्यशाळा आयोजनासाठी प्रदीप मोहोड, कल्पना
वानखडे, ज्योती येरखेडे, रवि मोडके,जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सचिन घाटे, वनस्टॉप
सेंटरचे रोशन टाले व प्रिया इंगळे यांनी सहयोग दिला.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा