घरोघरी तिरंगाः आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅली






अकोला, दि.१२(जिमाका)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आवारात या रॅलीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी हिरवी झेंडी दाखवली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारि सौरभ कटीयार यांच्या संकल्पनेतून ही रॅली आयोजीत करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत बाळासाहेब बुटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत पवार, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. वि. डी. करंजेकर, डॉ मनीष शर्मा, डॉ जावेद खान, हिवताप अधिकारी डॉ. महानकर, डॉ.बोरखडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बनसोडे यांचे सह आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ही रॅली जिल्हा परिषद आवारातून सुरू होऊन, अशोक वाटिका,नवीन बस स्टँड, गांधीरोड मार्गे पंचायत समिती अकोला येथून पुन्हा जिल्हा परीषद आवारात आली, तेथेच या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीद्वारे प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले. रॅलीचे पथ निर्देशन विस्तार अधिकारी आरोग्य अविनाश बेलोकर यांनी केले. लेखा व्यवस्थापक दीपक मलखेडे, रितेश चौबे, संदीप देशमुख, श्रीकांत ठाकरे,सचिन उनवणे, प्रशांत गुल्हाने,गणेश बोरकर, प्रवीण देशमुख,अविनाश उजाडे आदींनी त्यांना सहकार्य केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ