अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्यावरून माल वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 अकोला दि.27(जिमाका)- अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्यावरून माल वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली असून या माल वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश जारी केले आहेत.

यासंदर्भात आदेशात म्हटले आहे की, रेल्वे स्टेशन अकोला परिसरात सुरु असलेला मालधक्का माहे जुलै 2020 मध्ये बंद करून अकोला येथील दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील शिवणी शिवापूर येथे रेल्वे रेक पॉईंट सुरु करण्यात आला होता. परंतू शिवणी शिवापूर येधील रेल्वे रेक पॉईंटमध्ये कवर शेड, फ्लोअरिंग कंम्पाऊंड, वॉल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सी.सी. टी.व्ही कॅमेरे इ. मूलभूत सुविधा ह्या अगदी प्राथमिक अवस्थेत आहेत. मुसळधार पावसामुळे तेथील मालाचे नुकसान होते. व्यापारी, शेतकरी, माथाडी कामगार यांचे आर्थीक नुकसान होत आहे. शेती उपयुक्त खते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावे व मालाचे नुकसान टाळण्यासाठी शिवणी शिवर येथील रेक पॉईंटवर पायाभूत सुविधांची उभारणी होईपर्यंत रेल्वे प्रशासनाने अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रेक पॉईंट पुर्ववत सुरु केला आहे. त्यामुळे अकोला येथील मध्य रेल्वे परिसरातील रेक पॉईंटमुळे, अकोला शहरातील रहदारी व प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्यांनी आदेश जारी केले आहेत.

आदेशात म्हटल्यानुसार,

१.अकोला येथील मध्य रेल्वे परिसरातील मालधक्क्यावरून वाहतूक करणाऱ्या जड वाहनास, मोटार वाहन अधिनियम

1988 मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक असेल.

२.अकोला येथील मध्य रेल्वे परिसरातील मालधक्क्यावरून जड वाहनाद्वारे मालाची वाहतूक ही केवळ रात्री 10.30  वा. ते सकाळी 7.30 या दरम्यान करण्यात यावी. दिवसा सकाळी 7.30 वाजतानंतर जड वाहतूक करता येणार नाही.

३. शहरामध्ये वाहतूक करतांना वाहतूक अधिनियमामध्ये ठरवून देण्यात आलेल्या तरतुदीप्रमाणे वेग नियंत्रीत ठेवावा. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहतुक करता येणार नाही.

४.वाहतुकीमुळे रस्त्यावरील इतर वाहनांना अडचण होणार नाही. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची संबंधीत वाहन चालकाने खबरदारी घ्यावी.

५.क्षमतेपेक्षा जास्त मालाचे वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यास वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत दंडात्मक कार्यवाही करावी.

६.अकोला शहरातील जड वाहनाचे वाहतुकीवर संबंधीत वाहतुक शाखेने नियंत्रण ठेवावे.

७.या व्यतिरिक्त रहदारी संबंधी शासनाने तयार केलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ