घरोघरी तिरंगाः जनजागृतीसाठी स्केटिंग, तायक्वोंदो खेळाडूंची प्रात्यक्षिके

 





अकोला, दि.१३(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी स्केटींग व तायक्वोंदो खेळाडुंनी प्रात्यक्षिके सादर केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशभक्तीपर गीते व भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वाहतुक पोलीस निरीक्षक विलास पाटील, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले,  जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी  अथर्व भुसारी, नीरज वांडे, स्वरित राठोड या खेळाडूंनी प्रात्यक्षिके सादर केले. शिवाजी तायक्वोंदो संघटना व रॉलबॉल स्केटींग असोसिएशन या संस्थांनी यात सहभाग दिला.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ