हवामान अंदाजः विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता


अकोला,दि.12(जिमाका)- भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 16 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे काटेपुर्णा, वान, दगडपारवा, पोपटखेड, मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्याअनुषंगाने या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेऊ नये. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ