घरोघरी तिरंगाः जनजागृतीसाठी माजी सैनिकांची मोटारसायकल रॅली

 








अकोला, दि.12(जिमाका):- ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज अकोला शहरातील प्रमुख मार्गांवरुन माजी सैनिकांनी मोटार सायकल रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज सायकांळी चार वा. ही मोटार सायकल रॅली सुरु झाली. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ना.ब. वाघ, तहसिलदार सुनिल पाटील, पोलीस उपअधीक्षक दुधगावकर, कल्याण संघटक तेजराव निखाडे, सुरेश थोरात, गजानन पवार तसेच  जिल्ह्यातील माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन निघून सरकारी बगीचा, सिटी कोतवाली, टिळक चौक, जयस्तंभ चौक, जिल्हा स्त्री रुग्णालय, दुर्गा चौक, कौलखेड चौक, सिद्धी कॅम्प मार्गे टॉवर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या मोटार रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ