संसदीय क्षेत्र रस्ता सुरक्षा समिती बैठक: रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा
अकोला, दि.८(जिमाका):- जिल्ह्यात होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, रस्त्यांवर दिशादर्शक फलक, रेडियमचा वापर, काम प्रगतीपथावर असलेल्या ठिकाणी पर्यायी वळण रस्ते इ. उपाययोजनांचा अवलंब करावा. रस्ते अपघात झाल्यास त्याची ऑनलाईन माहिती रस्ते अपघातांची एकत्रित माहिती संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या (IRAD) पोर्टलवर माहिती अचूक भरावी, ज्यामुळे नेमक्या अपघातस्थळाची माहिती मिळून त्या जागेवर सुरक्षा उपाययोजना करता येतील, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
संसदीय क्षेत्र रस्ता सुरक्षा
समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
जयश्री दुतोंडे, उपविभागीय अधिकारी अकोला डॉ. निलेश अपार, बाळापूर डॉ. रामेश्वर
पुरी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
अनंत गणोरकर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाच्या वतीने IRAD
हे पोर्टल तयार करण्यात आले आहे, या पोर्टलवर झालेल्या अपघातांची अपघात स्थळासह
माहिती अपलोड करावयाची असते. यामुळे अपघातप्रवण स्थळे ओळखणे सोपे जाते. त्यामुळे
त्या त्या स्थळावर जाऊन तेथील तांत्रिक बाबी समजावून घेऊन अपघात कोणत्या कारणामुळे
झाला, हे ओळखून त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल. त्यासाठी जिथे जिथे अपघाताची नोंद
होऊ शकते अशा म्हणजेच पोलीस स्टेशन, परिवहन विभाग, आरोग्य विभाग इ. विभागांनी आपापले
युजर आय डी तयार करुन माहिती भरावी,असे
निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
बैठकीत माहिती देण्यात आली
की, अकोला शहर भागात सन २०२१ मध्ये २० तर
२०२२ मध्ये २३ अपघात झाले. ग्रामिण भागात
सन २०२१ मध्ये ५४ अपघात तर २०२२ मज्ञे ४७ अपघात झाले. अपघातांच्या स्थळांची माहिती
घेऊन थेथे आवश्यक दुरुस्त्या, उपाययोजना, दिशादर्शक फलक इ. अंमलबजावणी करुन अपघात
टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा