जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती; जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

 



अकोला, दि.३०(जिमाका)-  समाजात रुजलेल्या काही अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम जारी केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी जादूटोना विरोधी कायदाचा जिल्हा व ग्रामस्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.टी. मुळे, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ