महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 5 हजार 77 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा


अकोला दि.21(जिमाका)-  महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.21) रोजी जिल्ह्यात  महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षा 12 उपकेंद्रावर दोन सत्रात  सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता पहिल्या सत्रात 3 हजार 457 परिक्षार्थीपैकी 2 हजार 548 परिक्षार्थी तर दुसऱ्या सत्रात 3 हजार 457 परिक्षार्थीपैकी 2 हजार 529  परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 1 हजार 837 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी दिली.

एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर तहसिलदार सुनिल पाटील, खरेदी अधिकारी बळवंत अरखराव, जिल्हा सूचना अधिकारी अन‍िल चिंचोले  यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले. परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक सदाशिव शेलार यांनी प्रत्‍यक्ष भेटी दिल्‍या. 

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ