कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत नऊ पॉझिटीव्ह, तर नऊ डिस्चार्ज
अकोला दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 119 अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून दोन असा एकूण नऊ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, तर नऊ जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 7 व खाजगी 2)9+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण
पॉझिटीव्ह 9.
आरटीपीसीआर
‘नऊ’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या अहवालात सात
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष
व पाच
महिलेचा समावेश असून हे सर्व रुग्ण मुर्तिजापूर येथील एक, अकोला ग्रामीण येथील
दोन व उर्वरित चार जण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत. तसेच दोन रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब
मधून प्राप्त
झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
नऊ डिस्चार्ज
आज दिवसभरात नऊ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘37’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65772(49649+15132+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७ सक्रिय
पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा