डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा

 





अकोला दि.२६(जिमाका)- येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैल पोळा हा सण उत्साहात साजरा झाला.

या सोहळ्यास मध्यवर्ती संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर,  कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विभाग प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग डॉ. शेषराव चव्हाण, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे  संचालक डॉ. हरमनसिंग सेठी,  डॉ. गोविंद जाधव, डॉ. एस. एस. तायडे, उपकुलसचिव राजीव कटारे, डॉ. सतीश ठाकरे, डॉ. जयंत देशमुख, कुलगुरू कार्यालयाचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, तांत्रिक अधिकारी डॉ. नीरज सातपुते, सुहास कोळेश्वर, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, यांचे सर्व यांचेसह सर्व प्रक्षेत्र प्रभारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार वृंद उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बैलांची मनोभावे पूजा करण्यात आली व ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. राजेश्वर शेळके, डॉ. संजय शेगोकार, डॉ. संजीव नागे, डॉ. प्रकाश कहाते, राजेश ढगे, रवि पवार, शशिकांत गोटे ,सतीश मुन्नरवार,जगदीश राठोड, गिरीश बानोकार आदींची उपस्थिती होती.

तर  विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रक्षेत्रावर सुद्धा विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांचे प्रमुख उपस्थितीत बैलांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्यानविद्या विभागातील फुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गुप्ता, कृषी विद्या विभागाचे डॉ. जयंत देशमुख, डॉ. नितीन पत्की, डॉ. नितीन राऊत, डॉ.मिलिंद गिरी, डॉ. इसाळ यांचे सह शास्त्रज्ञ, अधिकारी- कर्मचारी यांचेसह सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे व विभागाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी, कामगार  वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ