शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष; कर्मचाऱ्यांची माहिती अद्यावत करा-जिल्हा सांख्यिकी विभागाचे आवाहन

 

 अकोला, दि. 19(जिमाका):-  शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2022 करीता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती दि. 1 जुलैपासून अद्यावत करण्याची सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कक्षेतील सर्व कर्मचाऱ्यांची माहितीकोषातील माहिती अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक प्रफुल्ल पांडे यांनी केले आहे.

नियोजन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संगणकीय ऑनलाईन आज्ञावलीमध्ये भरण्यासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अकोला यांचेकडून लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन घ्यावा. माहितीकोषातील माहिती विहित वेळेत पार पाडायची आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांना जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून दि. 30 ऑगस्टपर्यंत लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन दिल्या जाईल. दि. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने माहिती देणे व पहिले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच दि. 1 डिसेंबर 2022 ते दि. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने त्रुटीचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.

पहिले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2022 च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयक कोषागार कार्यालयात स्विकारली किंवा पारीत केल्या जाणार नाहीत. तसेच दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयक कोषागार कार्यालयात स्विकारली किंवा पारीत केली जाणार नाहीत, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ