मौजे निपाना येथील जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; जनावरांच्या खरेदी, विक्री व वाहतुकीस मनाईःजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


 अकोला,दि.25(जिमाका)-  अकोला तालुक्यातील मौजे निपाना याठिकाणच्या जनावरामध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. त्याअनुषंगाने या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेवून  संक्रमण व सांसंर्गिक रोप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार प्राप्त अधिकारानुसार मौजे निपाना या संसर्गकेंद्रापासून 10 किलोमिटर बाधित क्षेत्र घोषीत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकिकरण करुन 10 किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करणास प्रतिबंध घालण्यात येत आहे. तसेच जिल्हा पशुसवंर्धन विभागाने प्रादुर्भाव भागातील पाच किमी परिघातील जनावरांना गोट पोक्स लसीकरण तात्काळ करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ