स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; बुधवारी (दि.१७)‘समुह राष्ट्रगीत गायन’

अकोला, दि.१५(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत बुधवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात  सर्व शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, खाजगी आस्थापना, दुकाने व स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे व हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

हा उपक्रम राबविण्यासाठी शासनाने परिपत्रक जारी करुन सुचना दिल्या आहेत. त्या याप्रमाणेः- बुधवार द‍ि. १७ रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी सर्वत्र समूह राष्ट्रगीत होईल. या राष्ट्रगीत गायनासाठी ज‍िल्ह्यातील सर्व खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा, महाव‍िद्यालये, शैक्षण‍िक संस्था, व‍िद्यापीठे यामधील  व‍िद्यार्थी, श‍िक्षक तसेच नागरीक, सर्व कार्यालय, यंत्रणा, अधिकारी व कर्मचारी, सहकारी संस्था, सर्व खाजगी आस्थापने, दुकाने, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११ ते ११ वाजून एक मिनिट या एका मिनिटामध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्ष‍ित आहे.

राष्ट्रगीत गायनाच्या वेळी राष्ट्रगीताचा उचित सन्मान राखण्याबाबत दक्षता घ्यावी. या उपक्रमामध्ये सर्व खाजगी आस्थापना, व्यापारी प्रत‍िष्ठाने, संस्था, शासकीय व न‍िमशासकीय कार्यालये मधील सर्व संबंधीतांनी अध‍िकारी व कर्मचारी यांनीही सक्रीय सहभाग घ्यावा.

या सुचनांनुसार सर्व नागरीक, शासकीय निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठ, शाळा, व‍िद्यालये, महाविद्यालयांनी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ कार्यक्रम पार पाडावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय – निमशासकीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त सर्व यंत्रणा, कार्यालये यांना त्यांच्यास्तरावरून सुच‍ित करावे, असे आवाहन न‍िवासी उपजिल्हाध‍िकारी संजय खडसे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ