दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

अकोला दि.29(जिमाका)-  दीनदयाल स्पर्श योजनेअंतर्गत डाक विभागाव्दारे इयता सहावी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेव्दारे विद्यार्थ्यांमध्ये डाक तिकीट संग्रहणाचे छंद, त्यांच्या योग्यता व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी फिलाटेली प्रतियोगिता घेतली जाते. या प्रतियोगितेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन डाक विभागाचे अधीक्षक यांनी केले आहे.

            महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलमधील 40 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी पाचशे रुपये दरमहा प्रमाणे सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी फिलाटेल डिपॉझिट ॲकाऊंट काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा. तसेच फिलाटेली आधारित लेखी परीक्षा दि. 15 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय कार्यालय, नागपूर येथे घेण्यात येईल. प्रतियोगितेचा निकाल दि. 10 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. जे परिक्षार्थी या परिक्षेत पास होतील त्यांना फिलाटेलीवर आधारित प्रकल्प सर्कल कार्यालय, मुंबई येथे सादर करावा लागेल.  या योजनेचा अंतिम निकाल 29 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांना यायोजनेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस येथे संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागाव्दारे करण्यात येत आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ