आदिवासी विकास विभागाच्यावतीने जागतिक आदिवासी अस्मिता दिन साजरा

 अकोला दि.12,( जिमाका)- आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या वतीने जागतिक आदिवासी अस्मिता दिवस (दि.9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहुद्वेशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, प्रबोधन नगर, खडकी,  येथे आयोजीत करण्यात आला.  

            या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई भेाजने, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, श्रीमती  प्रतिभाताई अवचार, उमेश पवार,  अजाबरावजी उईके, अमरसिंग  भेासले, रामसिंग डाबेराव, सुरज सोळंके, शिवसिंग सोळंके आदी मान्यवर उपस्थित  होते. यानिमित्त घरोघरी तिरंगा या उपक्रमातील सहभागासाठी 300 ध्वजांचे वितरण करण्यात आले. शासकीय आश्रमशाळा किन्हीराजा येथील विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून आदिवासी संस्कृती व कलांचा परिचय दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना