राष्ट्रीय पशुधन अभियान: वैरणीसाठी शेवगा लागवड योजना; लाभ घेण्याचे आवाहन

 अकोला, दि.२३(जिमाका)-केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड योजना राबविण्यात येत असून शेवगा लागवडीसाठ अनुदान देण्यात येते, या योजनेचा पशुपालक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी १५ हेक्टर क्षेत्राकरीता साडेचार लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यात लाभार्थ्याला प्रति हेक्टरी ७.५ किलो शेवगा बियाण्यासाठी  ६७५० रुपये तर जमिनीची मशागत व लागवड, खते व अन्य अनुषंगिक खर्चासाठी  २३ हजार २५० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. पशुपालकांना प्रथम टप्प्यातील अनुदान ११ हजार ६२५ रुपये  प्रति हेक्टर प्रमाणे  शेवग्याची शेतात लागवड केल्यानंतर व दुसरा हप्ता लागवडपश्चात एक वर्षानंतर  डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येईल. अनुदानाचे दोन्ही हप्ते वितरीत करण्यापूर्वी कार्यक्षेत्रातील संबंधित संस्था प्रमुख पशुधन विकास अधिकारी/ सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या मार्फत शेवगा लागवडीची प्रत्यक्ष क्षेत्रपाहणी करुन खातरजमा केली जाईल. त्यासाठी क्षेत्रपाहणीच्या अहवालासोबत भूक्षेत्र निर्देशक नोंदणीसह (Geo Tagging) छायाचित्रे जोडणे अनिवार्य आहे. त्यानंतरच अनुदान वितरीत होईल. लाभार्थी निवडीनंतर दिलेल्या मुदतीत शेवगा लागवड न झाल्यास निवड रद्द करुन प्रतीक्षा यादीतील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ देण्याट येईल.  योजनेच्या लाभासाठी लाभार्थी पशुपालकाकडे एक हेक्टर बारमाही सिंचनाची सुविधा असावी. अधिक माहितीसाठी तालुक्याच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बुकतारे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ