अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान;31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ


            अकोला,दि.22(जिमाका)- सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने इच्छुक संबधित संस्थानी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि.31 ऑगस्टपर्यंत पाठवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार, अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित वा विनाअनुदानित वा कायम विनाअनुदानित  शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते. ही अनुदान योजना अल्पसंख्याक विभागाच्या दि.7 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयान्वये  राबविण्यात येते. तरी इच्छुक शाळा, संस्थांनी शासन निर्णयानुसार परिपूर्ण प्रस्ताव  जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावा. मुदतीनंतर प्राप्त प्रस्तावांचा विचार होणार नाही. तसेच शासन निर्णयानुसार अपात्र संस्थांनी प्रस्ताव सादर करु नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ