कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत दोन पॉझिटीव्ह


      अकोला दि.29(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 26 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य=एकूण पॉझिटीव्ह 2.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘19

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65820(49688+15141+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 19 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील दोन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 17 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ