कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत ‘दोन’ पॉझिटीव्ह, तर सहा डिस्चार्ज


        अकोला दि.5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 130 अहवाल प्राप्त झाले. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, तर सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 2 व खाजगी 0)2+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 2.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिलाचा समावेश असून ते अकोला ग्रामीण भागातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सहा डिस्चार्ज

आज दिवसभरात सहा रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘38

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65761(49640+15130+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 38 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना