स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती’ या विषयावर व्याख्यान

 


अकोला, दि.१३(जिमाका):-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती’ या विषयावर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्याराष्ट्रीय सेवयोजना शाखेने व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला. नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी तसेच देश भ्रष्ट्राचारमुक्त करण्याचे आवाहन उत्तम नामवाडे यांनी  केले. तसेच नागरिकांची सनद व कर्तव्य, जबाबदारी याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य पी. एन. जयस्वाल, उपप्राचार्य एस.आर. ठोकरे, गटनिदेशक रणजित महल्ले, पोलीस निरीक्षक खैरनार आदी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ