स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 अकोला, दि.14(जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून स्वयंस्फूर्तेने सहभाग घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

कार्यक्रम याप्रमाणे :  सकाळी 9 वा. 5 मि.नी  जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे ध्वजारोहण कार्यक्रम. सकाळी 10 ते 11.30 वाजपर्यंत शास्त्री स्टेडियम, अकोला येथे सांस्कृतिक कार्यक्रम व पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्लॅश मॉब कार्यक्रम. पोलीस बॅण्ड पथक व संकल्प प्रतिष्‍ठान ढोलताशा पथकाद्वारा देशभक्तीपर गित वादन कार्यक्रम. सकाळी 10 ते 11 वाजता शहरातील प्रमुख ठिकाणी अशोक वाटीका चौक, रेल्वे स्टेशन चौक, रतनलाल प्लॉ चौक, हुतात्मा चौक, सिव्हील लाईन चौक, भगतसिंग चौक, गांधी चौक या ठिकाणी एकता बॅण्ड पथकाव्दारे देशभक्तीपर गित वादन कार्यक्रम. सायंकाळी सात वाजतापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूले नाटयगृह, अकोला येथे देशभक्तीपर गित गायन कार्यक्रम.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ