घरोघरी तिरंगाः लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचाही सक्रिय सहभागाचा निर्धार ;उत्स्फूर्त व उत्कृष्ट अभियान राबवू-आ.गोवर्धन शर्मा
अकोला, दि.५(जिमाका):- ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासंदर्भात आज झालेल्या
बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी
संस्था यांनी या राष्ट्रीय उत्सवात आपला सक्रिय सहभाग देण्याचा निर्धार व्यक्त
केला. ‘घरोघरी तिरंगा’, हे
अभियान देशात सर्वत्र दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. अकोला शहर
व जिल्ह्यात हे अभियान अत्यंत उत्स्फूर्त व उत्कृष्टपणे राबवून देशभरात लौकीक मिळवावा,
असे आवाहन आ. गोवर्धन शर्मा यांनी केले.
जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या
या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता
द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक
जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक नयन
सिन्हा, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
अधीक्षक स्नेहा सराफ, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, राष्ट्रीय सेवा
योजना समन्वयक रतनलाल येऊल, फरिदा बेगम, डॉ.
रश्मी जोशी, ॲड. श्रृती भट, आश्विनी सरोदे, निलेश देव, शाहीर मधुकर नावकार, जादुगार
एस कुमार, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्स्ह
मोहम्मद अजहरोद्दीन, शिक्षक समितीचे प्रशांत
आवगेत, युवा शक्ती क्रांती सेना, हिंदु
जनजागृती समिती, नारी शक्ती सेवा फाउंडेशन, कराटे असोसिएशन, विवेकानंड युवा मंडळ
इ. तसेच सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सौरभ कटियार यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरोघरी तिरंगा अभियान
राबविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच मनपा आयुक्त कविता
द्विवेदी यांनी महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या नियोजनची, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर
यांनी पोलीस विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. या अभियानासंदर्भात प्राप्त चित्रफितीही
यावेळी उपस्थितांसमोर प्रदर्शित करण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे
यांनी या अभियानासाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.
आ. वसंत खंडेलवाल यांनी, घरोघरी
तिरंगा हा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त असून हा आपला राष्ट्रीय
सण आहे, त्यामुळे सर्व समाज घटकांनी आपला उत्सव समजून त्यात सहभागी व्हावे व
एकात्मतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन केले.
आ. गोवर्धन शर्मा यांनी या अभियानामुळे
लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यानिमित्त जिल्ह्यातील शहिदांच्या माता पितांचा
सन्मान करण्यात यावा. त्यात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ह सहभागी असू. या महोत्सवात अकोला जिल्ह्यात सर्वात उत्कृष्टरित्या
सहभाग नोंदविला गेला पाहिजे, प्रत्येकाने उत्साहात सहभाग द्यावा, हे अभियान देशात
सर्वोत्कृष्टरित्या अकोल्यात राबविले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घरोघरी
तिरंगा हा उपक्रम उत्कृष्टरित्या राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन व सर्व विभाग
एकत्रितरित्या प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमांत सगळ्यांनी सहभाग द्यावा,असे आवाहन
केले.
००००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा