जिल्हा ग्रंथालय;‘स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोष’ वाचनासाठी उपलब्ध


            अकोला दि.19(जिमाका)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथालय संचालनालय विभागाकडून ‘स्वांतत्र्य सैनिक चरित्रकोष’ विदर्भ विभाग खंड 1 व 2 जिल्हा ग्रंथालय कार्यालय, अकोला येथे उपलब्ध झाले आहे. या चरित्रकोषात विर्दभातील स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी सहभाग घेतला परंतु जे अद्यापही प्रकाश झोतात आले नाही अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या चरित्रकोषात देण्यात आली आहे. हा चरित्रकोष वाचनासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयात उपलब्ध असून वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे जिल्हा ग्रंथपाल अ.पु. वानखडे यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ