स्वातंत्र्य दिनी (दि.15) ‘रानभाजी महोत्सव’

 अकोला दि. 12 (जिमाका)- लोकांमध्ये रानभाज्याबाबत ओळख, आरोग्य विषयक महत्व व जागृती करण्यासाठी सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3  यावेळात रानभाज्या महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ कार्यालय, परिसर, मुर्तिजापूर रोड, अकोला येथे कृषी विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व प्रकल्प संचालक आत्मा यांचे संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी कळविले आहे.

रानभाजी महोत्सवात जिल्ह्याच्या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गटांमार्फत रानभाज्या विक्रीसाठी, माहिती व ओळख होण्याकरीता अकोला शहरातील रहिवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अनुषंगाने रानभाजी विक्रीसाठी स्टॉल आवश्यक असल्यास शेतकऱ्यांनी / शेतकरी उत्पादक कंपनीने / शेतकरी गटांनी ‘आत्मा’ कार्यालयास दि. 13 पूर्वी संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी रानभाजी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहनही प्रकल्प संचालक ‘आत्मा’ यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम